धरणगावातील विवाहितेचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू
Married woman in Dharangaon died due to electric shock धरणगाव : शहरातील 26 वर्षीय विवाहितेचा पाण्याची मोटार सुरू करताना इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैशाली विजय लोहार (26, तिलक तलावाजवळ, धरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
अशी घडली घटना
वैशाली लोहार या महिला आपल्या परीवारासह धरणगाव शहरातील तिलक तलाव परीरात वास्तव्याला होत्या. गुरूवार, 6 जुलै रोजी सकाळी पाण्याची लहान ईलेक्ट्रीक मोटार पाणी भरण्यासाठी सुरू करण्यासाठी गेल्या असतांना त्यांनी विजेचा जोरदार धक्का बसला. त्यातच त्या बेशुध्द झाल्या. त्यांना स्थानिक नागरीक व शेजारी राहणार्यांनी तातडीने धाव घेवून खाजगी वाहनाने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सायंकाळी पाच वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.


