भरधाव रीक्षाच्या धडकेने कठोर्यातील तरुणाचा मृत्यू ; बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश
The death of a young man in the city after being hit by a speeding rickshaw ; The heartbreaking cries of the sisters जळगाव : घराकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला रीक्षाने धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात कपिल अशोक सपकाळे (27, रा.कठोरा) या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी जळगाव तालुक्यातील कानळदा गावानजीक घडला. अपघातानंतर मयत कपिलच्या तिघा बहिणींनी मोठा आक्रोश केला.
घराकडे निघाल्यानंतर गाठले मृत्यूने
जळगाव तालुक्यातील कठोरा गावातील रहिवासी असलेला कपील हा जळगाव शहरात खाजगी नोकरीला होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कपिल हा आपल्या दुचाकीने घरी कठोरा जाण्यासाठी कानळदा मार्गे जात असताना कानळदा गावाजवळ अज्ञात मालवाहू अॅपेने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कपिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. खिशातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. मयत कपिलच्या पश्चात आई, आजाराने ग्रस्त असलेले वडील आणि विवाहित तीन बहिणी असा परीवार आहे. भावाचा मृतदेह पाहिल्यावर बहिणींनी काळीज चिरणारा आक्रोश केला. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि घरातील कर्ता मुलगा गेल्याने गावात शोककळा पसरली.


