रेल्वेचा ब्लॉक : महाराष्ट्र एक्स्प्रेस धावणार पुण्यापर्यंतच धावणार
Railway Block : Maharashtra Express will run only till Pune भुसावळ : रेल्वे लाईन दुहेरीकरणाच्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील नांद्रे-सांगली दरम्यान ब्लॉक घेतल्याने रेल्वे प्रशासनातर्फे काही गाड्या रद्द तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड, शॉर्ट ओरीजिनेटेड, रीशेड्यूल आणि अन्य मार्गाने वळवल्या आहेत.
महाराष्ट्र एक्स्प्रेस उद्या पुण्यापर्यंत धावणार
त्यात (12780) हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्स्प्रेस ही गाडी रविवार, 9 जुलैला हजरत निजामुद्दीन येथून निघून दौंड, कुर्डुवाडी, मिरजमार्गे वळवण्यात येईल तर कोल्हापूर-गोंदीया (11039) ही गाडी 7 जुलै रोजी कोल्हापूर येथून 20 मिनिटाने सोडण्यात आली तर वास्को द गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) ही गाडी सोमवार, 10 जुलैला वास्को द गामा येथून सुटेल. ही गाडी 45 मिनिटे विलंबाने सुटणार असून या कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी 10 जुलैला पुणे स्टेशनवरून सुटेल तर कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस सोमवार, 10 जुलै रोजी पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
