शिव कॉलनीत घरफोडी : 26 हजारांच्या ऐवजावर डल्ला
Burglary in Shiv Colony : Dalla for 26 thousand जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून शिव कॉलनीत बंद घर फोडून 26 हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
जळगाव शहरातील शिवकॉलनी परीसरात सुनंदा गिरीश झोपे या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. शुक्रवार, 7 जुलै रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून ते भाडेतत्वावर घेतलेल्या घरात गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत कपाटातून पाच हजारांची रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण 26 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. शनिवार, 8 जुलै रोजी सकाळच्या सुमारास सुनंदा झोपे या घरी गेल्या असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास सुनंदा झोपे यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तपास हवालदार सुशील चौधरी करीत आहेत.


