रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 20 लाखात फसवणूक : भुसावळातील एकाविरोधात गुन्हा
20 lakh fraud on the pretext of getting a job in railways : A case against one in Bhusawal पाचोरा : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने पाचोरा तालुक्यातील तरुणाची तब्बल 20 लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सन 2014 मध्ये नोकरीच्या आमिषाने रक्कम स्वीकारून नोकरी न लागल्याने या प्रकरणी तक्रारदाराने पाचोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर भुसावळातील प्रकाश हरचंद सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
मोहन फकिरा चौधरी (56, लोहटार, ता.पाचोरा) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून प्रकाश सोनवणे यांनी 20 लाख रुपये लोहटार, ता.पाचोरा येथे स्वीकारले मात्र नोकरी न लागल्याने वेळोवेळी पैसे मागूनही परत करण्यात आले नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर चौधरी यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश संतोष पाटील करीत आहेत.
