उमेदवारी मिळाल्यास रावेर विधानसभा ताकदीनिशी लढणार : मनीष जैन


Raver will fight with strength if nominated : Manish Jain रावेर : रावेर विधानसभेला अद्याप अवकाश असलातरी माजी आमदार मनीष जैन यांनी रावेर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिल्यास ताकदिनिशी आपण ही निवडणूक लढवू, असे सुतोवाच त्यांनी येथे केले.

माध्यमांकडे व्यक्त केली इच्छा
रावेर विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिल्यास नक्की पूर्ण ताकदनिशी रिंगणात उतरणार असल्याचे माजी आमदार जैन यांनी येथे सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी निमित्त ते मंत्री अनिल पाटील यांच्या सोबत रावेर तालुक्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी याबाबतची इच्छा व्यक्त केली.

दरवेळा आमदार बदलण्याची प्रथा
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीला मोठी चुरस राहणार हे स्पष्ट आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये येथून सातत्याने प्रत्येक पंचवार्षिकला आमदार बदलतात, असे आजवरचे चित्र राहिले आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने अनेकांनी आता पासुनच मोर्चाबांधणी केली आहे. आता माजी आमदार मनीष जैन यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.

लढत होणार रंगतदार
यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे, नंदू महाजन आदींची नावे भाजपकडून चर्चेत आहेत. काँग्रेसच्या वतीने शिरीष चौधरी अथवा त्यांचे पुत्र धनंजय चौधरी निवडणुकीच्या रींगणात उतरतील, अशी शक्यता आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून रींगणात उतरणार आहेत तर आता मनीष जैन यांनी देखील इच्छा व्यक्त केल्याने येथील लढत ही अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !