वंचित बहुजन आघाडीतर्फे गायरान धारकांसाठी 20 जुलै रोजी मुंबईत मोर्चा
भुसावळ : वंचित बहुजन आघाडीतर्फे गुरुवार, 20 जुलै रोजी मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात महाराष्ट्रातील अतिक्रमण जमिनीचे पट्टे नावावर व्हावे ही प्रमुख मागणी असून गायरान अतिक्रमण जमिनीच्या पट्टे धारक यांनी मोर्चा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अशोक सोनोने यांनी केले.
पंचशील नगरात बैठक
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांच्या उपस्थित महाराष्ट्रातील गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे हे संबंधितांच्या नावावर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यासाठी राज्यभर पक्षातर्फे नियोजनासाठी सभा बैठक होत आहेत. शहरातील पंचशील नगरातील धम्मदिप बौद्ध विहारात शनिवारी सकाळी 11 वाजता बैठक झाली. याप्रसंगी गायरान कृती समिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या उपस्थितीत व गायरान कृति समिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, माथाडी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, जिल्हा आय.टी. प्रमुख सचिन बार्हे, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ शहर महासचिव मेजर देवदत्त मकासरे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, विद्यासागर खरात, शेख याकुब शेख नजीर, अरुण तायडे, बंटी सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, प्रमोद बाविस्कर, बाळु कोळी (चोपडा), निलेश भालेराव (चोपडा), गौतम लोखंडे, सुनील ठाकुर, अरुण नरवाडे, महिला आघाडी मुक्ताईनगर तालुकाध्यक्षा संगीता धोबी, विशाखा गौतम, वैशाली राव (भुसावळ), रावेर तालुका महासचिव कांतीलाल गाढे, यावल तालुका महासचिव राजेश गवळी, बोदवड तालुका महासचिव सुभाष इंगळे, निलेश जाधव (भुसावळ), दौलत अढाइंगे (रावेर), लता तायडे, कंदर सिंग बारेला, शंकर लहासे, अक्षय निराले (जामनेर), स्वप्नील सोनवणे, संतोष सुरवाडे (मोढाळा), सुभाष शिंदे, अतुल पाटील, राहुल मोरे (बोदवड), रुपाली बार्हे (सांगवी), गीता इंगळे (सांगवी), सुरेश कडु अटकाळे (रावेर) सह जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
