भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनात 63 तक्रारी निकाली
63 complaints were settled in Bhusawal market police station during the grievance redressal day
भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केल्यानंतर 123 पैकी 63 अर्ज निकाली काढण्यात आले. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल गायकवाड यांनी शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले.
63 अर्ज निकाली
या तक्रार निवारण दिनात 123 अर्ज ठेवण्यात आले होते. त्यापैकी 63 अर्ज निकाली काढण्यात आले. दोन्ही बाजूकडील लोकांचा समझोता होवून वाद मिटल्याने अर्जदारांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. 60 अर्जावर पुढच्या तक्रार निवारण दिनात चर्चा होऊन संबंधित अर्जदारांना बोलाविले जाणार आहे. यापूर्वी सुध्दा तक्रार निवारण दिनात 100 पेक्षा अधिक तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले होते. शनिवारी झालेल्या तक्रार निवारण दिनात सकाळी 10 वाजेपासून अर्जदार पोलीसस ठाण्यात आले. संध्याकाळी सहा वाजेपर्यत तक्रार निवारण दिनात ठेवलेले अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू होती.

