जामनेरात डीपीचे ऑईल घेण्यावरून वाद : हाणामारीत पाच जण जखमी
जामनेर : महावितरण कंपनीच्या डीपीचे ऑइल घेण्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण होवून तुफान हाणामारी झाली. या घटनेत पाच जण जखमी झाले. हा प्रकार रविवारी दुपारी चार वाजता घडला. जामनेर पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे हाणामारी प्रकरण
जामनेर शहरातील श्रीराम पेठ परीसरात महावितरण कंपनीच्या डीपीच्या ऑइलवरून रविवारी दुपारी 4 वाजता वाजता वाद निर्माण झाला. यामध्ये दोन गटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकमेकांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या मारहाणीत आशाबाई कैलास कोळी, जितेंद्र कैलास कोळी, शुभम संजय लोणारी, उषा संजय लोणारी, प्रमिला समाधान लोणारी असे एकूण 5 जण जखमी झाले. जखमींना जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत आशाबाई कैलास कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तन्वीर मुनाफा शेख, समीर शेख लाला, लालू शेख सिराज शेख, रशीद खान, उजेब खान, सलीम रशीद, जावेद रशीद, आवेश शेख, आदिल शेख, निसार पटेल आणि फिरोज खान (सर्व रा. श्रीराम पेठ, जामनेर) यांच्या विरोधात रविवारी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.


