जळगावातील विवाहितेचा 30 लाखांसाठी छळ : पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा


जळगाव : नोकरी करण्यासह माहेरहून नवीन घर खरेदी करण्यासाठी 30 लाख रुपयो न आणल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यांकडे मंडळी विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

नोकरी करण्यासाठी आग्रह, घर घेण्यासाठी पैसे न आणल्याने छळ
जळगाव शहरातील जोशी कॉलनीतील माहेर असलेल्या प्रियंका सचिन पानसरे (33) यांचा विवाह नगर जिल्ह्यातील राहता येथील रहिवासी सचिन अरुण पानसरे यांच्याशी झाला असून विवाहितेने नोकरी करावी तसेच नवीन घर घेण्यासाठी माहेरहून 30 लाख रुपये आणावे, अशी मागणी सासरच्यांनी केली. विवाहितेने पैसे आणले नाही या कारणावरून तिला वेळोवेळी बेदम मारहाण व शिवीगाळ करत दमदाटी करून छळ करण्यात आला तसेच सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला मानसिक त्रास दिला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवार, 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर पती सचिन अरुण पानसरे, सासू सुमन अरुण पानसरे, सासरे अरुण धोंडीराम पानसरे आणि दीर सागर अरून पानसरे (राहता, जि.नगर) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !