जळगावातील डॉक्टरांकडील महागड्या कारची चोरी


जळगाव : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच शहरताील मोहन नगरातील वृंदावन गार्डन समोरून डॉक्टरांची दोन लाख रुपये किंमतीची स्विप्ट कार लांबवण्यात आली. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात कार चोरटे मुक्कामी
जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डनजवळ डॉ. साजीद दगडू तडवी हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे स्विप्ट (क्रमांक एम.एच.19 सी.यू.0280) आहे. शनिवार, 8 जुलै रोजी रात्री 10 वाजता डॉ. तडवी यांनी त्यांची कार त्यांच्या घरासमोर आलेल्या झाडाजवळ पार्क केल्याने चोरट्यांनी मध्यरात्री संधी साधली. रविवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार घडल्यानंतर डॉ. तडवी यांनी सोमवारी दुपारी एक वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !