गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतूसांसह चाळीसगाव तालुक्यातील दोघे जाळ्यात
Two from Chalisgaon taluk arrested with village pistol and six live cartridges चोपडा : चाळीसगाव तालुक्यातील दोघांना गावठी पिस्टलासह सहा जिवंत काडतूस बाळगताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. चोपडा तालुक्यातील लासुर-हातेड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. श्याम नामदेव चव्हाण (24) व समीर सुभान सय्यद (23, दोन्ही रा.हिरापूर, ता.चाळीसगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहे.
विक्रीच्या उद्देशाने फिरताना अटक
दोघे संशयीत गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस खरेदी करून दुसरीकडे विक्रीच्या उद्देशाने दुचाकीवर फिरत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सोमवार, 10 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील लासुर-हातेड रस्त्यावर दोघांना अडवणल्यानंतर संशयितांकडे दोन गावठी कट्टे आणि 6 जिवंत काडतूस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी श्याम नामदेव चव्हाण आणि समीर सुभान सय्यद या दोघांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक उमरसिंग वसावे करीत आहे.


