Bus crashes in Saptashringi Ghat : सप्तश्रृंगी घाटात बस कोसळली : मुडीतील महिला ठार ; 21 प्रवासी जखमी
Bus crashes in Saptashringi Ghat : Woman from Mudi killed ; 21 passengers injured नाशिक : सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेने निघालेल्या एस.टी.बस घाटा कोसळल्याने झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येथील महिलेचा मृत्यू झाला तर 21 प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्रीदादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले. आशाबाई राजेंद्र पाटील (50, मुडी, ता.अमळनेर) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
अपघाताचे कारण अस्पष्ट
खामगाव आगाराची बस (एम.एच.40 ए.क्यू.6259) ही मंगळवारी सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाल्यानंतर सप्तशृंगी गडावरून खाली येत असतांना घाटात गणपती टप्प्यावरुन थेट दरीत कोसळली. सुमारे 400 फूट दरीत कोसळल्याने बसमधील 21 प्रवासी जखमी झाले तर एक महिला प्रवासी ठार झाली. सर्व जखम प्रवाशांना वणी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
अपघातातील जळगाव जिल्ह्यातील जखमी असे
प्रमिला गुलाबराव बडगुजर (सुनील गुलाबराव बडगुजर, मुलगा, रा.मुडी, ता.अमळनेर)
रघुनाथ बळीराम पाटील (भोकर, जि.जळगाव)
बाळू भावलाल पाटील (भोकर, जि.जळगाव)
संजय बळीराम भाईर (मुडी, ता..अमळनेर)
सुशीलबाई सोनू बडगुजर (मुडी, ता.अमळनेर)
वच्छलाबाई साहेबराव पाटील (मुडी, ता.अमळनेर)
सुशीलबाई बबन नजान (मुडी, ता.अमळनेर)
विमलबाई भोई (मुडी, ता.अमळनेर)
प्रतिभा संजय भोई (मुडी, ता.अमळनेर)
जिजाबाई साहेबराव पाटील (मुडी, ता.अमळनेर)
संगीता मंगुलाल भोई (मुडी, ता.अमळनेर)
रत्नाबाई (नाव सांगता आले नाही) (मुडी, ता.अमळनेर)
सुरेखाबाई हिरालाल बडगुजर (मुडी, ता.अमळनेर)
संगीत बाबुलाल भोई (मुडी, ता.अमळनेर)
भारगोबाई माधवराव पाटील (मुडी, ता.अमळनेर)


