मोर नदीच्या पात्रात पडल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू


A young man from Jalgaon died after falling into the Mor river यावल : बोरखेडा जवळील मोर नदीच्या पात्रात असलेल्या कुर्‍हाड डोह परीसरात पर्यटनासाठी आलेल्या जळगावातील 22 वर्षीय तरुणाचा पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
दर्पण महेंद्र भोळे (22, जुना खेडी रोड, डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. जवळील मोर नदीच्या पात्रात कुर्‍हाड डोह असून या डोहाच्या परीसरात पर्यटक पर्यटनासाठी येतात मात्र सध्या डोहात पाणी मोठ्या प्रमाणात असलने दर्पण हा तरुण मित्रांसोबत आला असता डोहाजवळून जात असतांना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोहाच्या पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी तातडीने नागरीकांना माहिती दिली मात्र तोपर्यंत तरुणाचा पाण्यात बुडून झाला. तरुणाला तातडीने रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देविदास सूरदास करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !