भुसावळात आमदार नितेश राणेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

तृतीयपंथीयांचा अपमान करणार्‍यांचा भुसावळात वंचित आघाडीतर्फे निषेध


Protest against MLA Nitesh Rane’s image in Bhusawal भुसावळ : तृतीय पंथीयाबद्दलचे अपमानजनक वक्तव्य करणार्‍या आमदार निलेश राणे यांचा शहरातील वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करण्यात आला तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन गुरुवारी सायंकाळी यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ करण्यात आले. राणे हे सातत्याने धर्म, जात व लिंग आधारित व्यक्तव्य करीत असून समूह समूह, जाती-जातीत द्वेष व तेड निर्माण करीत असल्याने त्याचाच एक भाग म्हणून आंदोलन करण्यात आले.

पोलिसांच्या कृतीचा निषेध
यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास वंचीत बहूजन आघाडीतर्फे आंदेलन छेडण्यात आले होते. यावेळी वंचीत बहूजन आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने अशी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांना तत्काळ गुन्हे नोंदवा असे निर्देशित केले आहे. भाजपा आमदार निलेश राणे यांच्या बेताल व अपमानजनक वक्तव्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याच्या ऐवजी वंचित बहुजन महिला व युवा आघाडीचे सदस्य बंड गार्डन पोलीस स्टेशन, पुणे येथे गेले असता दमदाटी व अपमानजनक वागणूक पोलिसांनी दिली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सुध्दा तक्रार तर नोंदवली नाही वरून त्यांना फरफटत पोलीस स्टेशन समोरुन पोलीस घेऊन गेले. हे अत्यंत बेजबाबदार व निंदनीय कृत्य पोलिसांनी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.

आंदोलनात यांचा सहभाग
यावेळी जिल्हाध्क्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, बालाजी पठाडे, सचिन बार्‍हे, वंदना आराक, शिवाजीराव टेंभूर्णीकर, गणेश इंगळे, गणेश जाधव, मेजर देवदत्त मकासरे, मीरा वानखेडे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !