पोलीस अधिकारी असल्याचे भासवत धरणगावातील वयोवृद्धाची अंगठी लांबवली
Pretending to be a police officer : the ring of an elderly man in Dharangaon was extended धरणगाव : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून रस्त्याने पायी चालणार्या वृद्धाला ठगवत त्याच्याकडील 30 हजार रुपये किंमतीची अंगठी लांबवण्यात आल्याचा प्रकार धरणगावातील महादेव मंदीर परिसरात घडली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
किशोर पदमनाथ शुक्ला (55, घोडे गल्ली, धरणगाव) हे बुधवार, 12 रोजी दुपारी 12.15 वाजता कामानिमित्त जात असतांना महादेव मंदिराजवळील दातांच्या दवाखान्यासमोरून जात असताना अचानक त्यांच्या मागून एक दुचाकी आली व एकाने शुक्ला यांना थांबवले तर त्यांच्या मागून आलेल्या एकाने मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, तुमची सोन्याची अंगठी काढून घ्या. शुक्ला यांनी 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी काढून भामट्याकडे दिली. भामट्याने ती अंगठी रुमालात बांधून शुक्ला यांच्याकडे दिल्याचा बनाव करत काका तुम्ही व्यवस्थीत घरी जा, असे सांगितले. घरी आपल्यावर शुक्ला यांनी आपल्या पत्नीस रुमालातून अंगठी काढण्यास सांगितले परंतु त्यात अंगठी नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शुक्ला यांनी पोलिसात धाव घेतली. तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहेत.


