जामनेरात सेवानिवृत्त कंडक्टरकडे धाडसी घरफोडी : पावणेचार लाखांचा ऐवज चोरीला
Audacious burglary at the house of a retired conductor in Jamner जामनेर : शहरातील शास्त्री नगर भागातील सेवानिवृत्त बस कंडक्टरांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल पावणेचार लाखांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कंडक्टरच्या घरात दवाखाना चालवणारे डॉक्टर अविनाश चिंतामण कुरकुरे यांच्या दवाखान्यातूनही चार हजारांची रोकड लांबवण्यात आली.
धाडसी घरफोडीने खळबळ
शास्त्री नगरात निवृत्ती माधव चौधरी (60 जामनेर) हे वास्तव्यास असून चोरट्यांनी शुक्रवार, 14 रोजी पहाटेच्या सुमारास घरफोडी केली. चोरट्यांनी 12 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा, 13 ग्रॅम वजनाची सोन्याच्या पोतमधील मणी, तीनन हजार रुपये किमतीची मेडीकल किट, तीन लाख रुपये रोख असा एकूण तीन लाख 64 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.


