जळगाव शहर पोलिसांची मोठी कामगिरी : सहा चोरीच्या दुचाकींसह अल्पवयीन चोरट्यांना पकडले
Big achievement of Jalgaon city police : Minor thieves caught with six stolen bikes जळगाव : जळगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील विविध भागातून चोरी केलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली.
आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
जळगाव शहरासह इतर बाजारपेठ परीसरातून नागरीकांच्या दुचाकींची चोरी झाल्याचे प्रकार वाढले होते. जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, ळगासव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, अमोल ठाकूर यांनी शुक्रवार, 14 जुलै रोजी मध्यरात्री एसएमआयटी कॉलेज परीसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.





संशयितांकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक विशाल निकुंभ करीत आहेत.
