कठोरा येथे तरुणाला कारण नसताना मारहाण : पिता-पूत्राविरोधात गुन्हा
Crime against father and son for beating youth for no reason in Kathora जळगाव : जळगाव तालुक्यातील कठोरा येथे काही एक कारण नसतांना दोन जणांनी तरुणाला लोखंडी रॉड तसेच लोखंडी पट्टीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारण नसताना मारहाणीचा आरोप
जळगाव तालुक्याताील कठोरा येथे सागर लक्ष्मण सपकाळे हा तरुण कुटुंबासह वास्तव्यास असून शेती करतो. शुक्रवारी सागर सपकाळे हा नेहमीप्रमाणे शेतात गेला असता कठोरा गावाच्या पुढे एका शेताजवळ कैलास संतोष सपकाळे व कौस्तुभ कैलास सपकाळे या दोघांनी काहीएक कारण नसतांना सागर सपकाळे यास मारहाण केली. यात कैलास सपकाळे याने सागर याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला तर कौस्तुभने सागर याच्या भुवईवर लोखंडी पट्टी मारुन दुखापत केली. या घटनेत सागर हा खाली पडला असता दोघांनी पुन्हा सागर याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तुला पाहून घेवू, तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. सागरच्या तक्रारीवरुन कैलास संतोष सपकाळे व कौस्तुभ कैलास सपकाळे या दोन्ही बापलेकांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहेत.


