अमळनेरात हॉटेल फोडले : 25 हजारांचा ऐवज लंपास


अमळनेर : शहरातील भाजीपाला मार्केटमधील हॉटेलमधील किचनचा पत्रा कापून दुकानातून विदेशी दारूच्या बाटल्यांसह रोकड, सिगारेटचे पाकीट असा एकूण 25 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी शनिवारी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेलमधील चोरीने खळबळ
अमळनेर शहरातील भाजीपाला मार्केट परीसरात हॉटेल पायल असून या ठिकाणी या दुकानात सिगारेट, विदेशी दारू असून 14 जुलै रात्री 11 ते 15 जुलै सकाळी 10 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हॉटेलमधील किचन रूमचा छताचा लोखंडी पत्रा कटरने कापून आत प्रवेश करत सिगारेट पाकीट, विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोकड असा एकूण 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर चंदन नानेकराम चौक (50, अमळनेर) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !