नशिराबाद येथील चिमुकलीचा विद्युत धक्का लागताच मृत्यू


A child from Nashirabad died due to electric shock नशिराबाद : शेतातील झोपडीच्या अंगणात खेळत असतांना विद्यूत खंब्याला धक्का लागल्याने तीन वर्षाची चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. नशिराबाद शिवारात ही घटना रविवार, 16 जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने सोबत असलेल्या मोठ्या बहिणी या बचावल्या. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बावली रूमला पावरा (3, नशिराबाद) असे मृत बालिकेचे नाव आहे.

सुदैवाने बहिणी बचावल्या
नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रूमला पावरा हा तरूण आई,वडील, पत्नी आणि तीन मुलीसोबत झोपडी करून वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या बाजूतून विद्यूत तारा गेलेल्या असून झोपडीच्या नजीक रूमला पावरा आणि त्याचे आईवडील यांची असे एकुण दोन झोपड्या आहेत. ईश्वर पावरा हा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेला असता रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रूमला पावरा यांची सर्वांत लहान मुलगी बावली ही आपल्या दोन मोठ्या बहिणीसोबत झोपडीजवळ खेळत होती. त्यावेळी लोखंडी खांब्यात विजेचा प्रवाह उतरलेला होता. त्यावेळी बावली ही खेळत असतांना तिचा विजेच्या खांब्याला धक्का लागला. त्यावेळी तिला विजेचा धक्का लागल्याने जागीच दुदैवी मृत्यू झाला. तिच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !