अट्टल घरफोड्या चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात


Chalisgaon city police caught Attal burglars चाळीसगाव : अट्टल घरफोड्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान अटक केली आहे. चाळीसगाव शहरातील पवारवाडी, हिरापूर रोड भागातील राजहंस थिएटरसमोर सोमवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मोहम्मद फातीर उर्फ गोल्या मियातुबल मोहम्मद (19, ईस्लामपूरा, जामनेर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात तीन तर जामनेर येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. संशयिताकडून लोखंडी टॉमी जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख, निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवरील नाईक राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !