मंगरूळच्या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू


Mangrul youth dies due to electric shock अमळनेर : अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावातील 36 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संदीप रंगराव बागुल (36, मंगरूळ, ता.अमळनेर) असे मृताचे नाव आहे.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
संदीप रंगराव बागुल हा तरुण आपल्या परीवारासह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे वास्तव्याला आहे. रविवार, 16 जुलै रोजी सकाळी घरी असताना त्याला विद्युत शॉक लागला व तिथेच बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला खाजगी वाहनाने अंमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी यांनी घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !