साळवा गावातील जिओ टॉवरच्या 35 हजारांच्या बॅटरी लांबवल्या


35 thousand batteries of Jio tower in Salwa village extended धरणगाव : धरणगाव तालुक्यातील साळवा गावातील जिओ मोबाईल टॉवरमधून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवली. याप्रकरणी रविवारी रात्री 11 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील साळवा गावात जीओ कंपनीचे टॉवर लावण्यात आले असून गुरुवार, 13 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची पॉवर बॅटरीची चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण रामचंद्र शिंदे (23, मराठे गल्ली, धरणगाव) यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. चोरट्यांनी रविवार, 16 जुलै रोजी रात्री 11 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सैय्यद करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !