जळगावात रीकव्हरी एजंट करीत होता दुचाकींची चोरी : चोरीच्या पाच दुचाकींसह संशयित जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात


Recovery agent was stealing two-wheelers in Jalgaon: Suspect with five stolen two-wheelers in the net of Zillapeth police जळगाव : रीकव्हरी एजंट म्हणून काम करणारा संशयित दुचाकी चोरटा असल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली असून पाच दुचाकींसह संशयीताला अटक करण्यात आली. चंद्रकांत रामदास साळुंखे (42, हिराशिवा कॉलनी, जळगाव) असे अटकेतील संस्थेत आरोपीचे नाव आहे. संशयीताला जिल्हापेठ पोलिसांनी एरंडोल येथून ताब्यात घेतले असून त्याने शहरातील विविध भागातून पाच चोरी केलेल्या दुचाकी काढून दिल्या आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दीसह इतर ठिकाणी दुचाकी चोरीचे सत्र सुरू असल्याने जिल्हापेठ पोलीस एका गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित चंद्रकांत साळुंखे हाच दुचाकींची चोरी करत असल्याचे समोर आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिक माहिती मिळविली असतांना संशयित आरोपी हा एरंडोल शहरात असल्याचे कळताच त्यास अटक करण्यात आली.

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, महिला पोलीस नाईक भारती देशमुख यांनी संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे याला एरंडोल शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !