जळगावच्या हुडको परीसरात हवेत गोळीबार : संशयित गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Firing in the air in Hudco area of ​​Jalgaon: Suspect in the net of crime branch जळगाव : तरुणांसोबत सुरू असलेल्या वादानंतर एकाने दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या शिवाजी नगर भागातील हुडको परीसरात सोमवार, 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती कळताच दीपक बागुल या संशयितास ताब्यात घेण्यात आले. संशयिताची कसून चौकशी सुरू असून त्याच्याविरोधात सायंकाळी उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परीसरात दीपक बागुल याचे काही तरुणांसोबत बिनसल्यानंतर वाद सुरू झाला. सोमवारी दुपारी दोन वाजता झालेल्या वाद वाढत चालल्यानंतर दीपक बागुल याने आपल्याकडील कट्ट्याद्वारे हवेत गोळीबार केल्याने या भागात प्रचंड खळबळ उडाली तर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अक्रम शेख आणि प्रीतम पाटील यांनी धाव घेवून संशयित आरोपी दीपक बागुल याला ताब्यात घेतले. जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयिताला आणण्यात आले असून उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अधिकार्‍यांकडून पाहणी
जळगाव शहर निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह प्रफुल्ल धांडे, गजानन बडगुजर, रतन गीते यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी दीपक बागुल याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !