म्हसावदच्या मजुराचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू


Mhasavad laborer dies due to drowning in riverbed जळगाव : गिरणा नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या किशोर श्रावण मराठे (40, म्हसावद) या मजुराचा पाय घसरुन नदीतील डोहात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. बराच वेळ पट्टीच्या पोहणार्‍यांनी शोध घेतला मात्र त्याचा मृतदेह मिळून येत नसल्याने अखेर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने शोध घेतल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला.

पाय घसरला आणि नदीपात्रातील डोहात पडला !
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे किशोर मराठे हे वास्तव्यास होते तसेच गावात हात मजुरीसह मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. मंगळवारी सकाळी 9 वाजता घरातून निघाले. त्यानंतर सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेले असता त्याठिकाणी अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते नदीपात्रातील डोहात पडले. डोहाची खोली अधिक असल्याने, त्यांना बाहेर निघणे शक्य न झाल्यामुळे त्यांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगी, दोन भाऊ असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !