रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे

जळगाव लोकसभेसाठी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे


Amol Haribhau became the District President of Raver Lok Sabha जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या भाजपा जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अखेर पक्षाने केली असून त्यात तरुण चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे तर जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.

तरुण रक्ताला संधी
भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्षपदांसाठी तरुण चेहर्‍यांना संधी दिली आहे. अमोल हरीभाऊ जावळे यांना आधी विधानसभा क्षेत्रप्रमुखपदावर नियुक्त करण्यात आले होते. याच्या पाठोपाठ त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे पक्षाचे फायरब्रँड नेते असून त्यांना बढती मिळालेली आहे. तर जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्वला बेंडाळे यांच्या माध्यमातून महिलेस संधी देण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !