मोटारसायकल चोरटा चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात


Motorcycle thief caught by Chalisgaon city police चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या बांधल्या आहेत. अनिल विठ्ठल चव्हाण (32, सांगवीतांडा, ता.चाळीसगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. नागद रोडवरील दिलीप गॅस एजन्सीजवळ संशयिताला अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मंगळवार, 18 रोजी सावरकर चौकातील महावीर झेरॉक्स दुकानासमोरुन सैय्यद आसीफ सैय्यद नवाज (तांबोळे बु.॥, ता.चाळीसगाव) यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो. कंपनीची मोटारसायकल (एम.एच.43 टी.8197) ही कोणीतरी लांबवली होती. चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र वच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास नाईक भूषण पाटील करीत आहेत. चार तासात हा गुन्हा उघडकीस आला हे विशेष.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !