अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू


Two people died in different incidents in Amalner taluka
अमळनेर :
अमळनेर तालुक्यात रढावन येथे एकाचा विहिरीत बुडाल्याने तर दुसर्‍याचा खदानीत बुडून मृत्यू झाला.

विहिरीत केली आत्महत्या
नितीन अंबादास मराठे (42, मुसळी, ता.धरणगाव, हल्ली मुक्काम रढावण राजोरे) हा आपला भाऊ शरद मराठे ,आई सोबत 19 जुलै रोजी शेतात काम करत होता.दुपारी अडीच वाजेला भाऊ घरी जायला निघाला असता नितीनने नंतर येत असल्याचे सांगितले मात्र घरी न आल्याने शुक्रवार, 21 रोजी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास त्याचे मामा राजेंद्र चिंतामण काळे यांच्या शेतातील विहिरीत डोकावल्यानंतर नितीनने आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.

खदानीत बुडून मजुराचा मृत्यू
दुसर्‍या घटनेत चोपडा रोडवरील खदानीत घडली. ताडेपुरा येथील देवा धाकू पारधी (40) हा मजुरी करत होता मात्र दोन दिवसांपासून तो कामाला गेल्यानंतर घरी परतला नाही. शुक्रवार, 21 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास देवळी शिवारातील खदानीत देवा मयत अवस्थेत आढळून आला. देवाच्या आतेभावाने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !