यावल तालुक्यातील तरुणीला पळवून नेत अत्याचार : डांभूर्णीतील तरुणाला अटक


Kidnapping and abducting young girl from Yaval taluka : Young man from Dambhurni arrested  यावल : यावल तालुक्यातील एका गावातील 27 वर्षीय तरुणीला आमिष दाखवून पळवून नेत डांभूर्णीतील तरुणाने ठिकठिकाणी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित भूषण हेमराज धनगर (डांभूर्णी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

असे आहे अत्याचार प्रकरण
यावल तालुक्यातील एका गावात 27 वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती मजुरी कामाला गेल्यानंतर संशयित भूषण धनगर याने तिच्याशी सलगी वाढवत तिला पैशांचे आमिष दाखवले व तरुणीला सावदा येथे बोलावत तिला दुचाकी (एम.एच.19 डी.एक्स.6852) वर बसवून ओंकारेश्वर नेले व तेथून बडवाह येथील एका लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला. 15 ते 21 जुलैदरम्यान हा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडीतेने यावल पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केल्यानंतर पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !