जळगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : हिंगोण्यातील आरोपीला अटक
Rape of minor girl in Jalgaon : Accused arrested in Hingone जळगाव : जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या व रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी हिंगोणा, ता.यावल येथील आरोपीला अटक करण्यात आली. संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अनिस भिकारी तडवी (20, रा.हिंगोणा, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार
रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 17 वर्षीय मुलीला 27 सप्टेंबर 2022 रोजी पळवून नेण्यात आले हातेे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल होता. अल्पवयीन तरुणीचा बुधवार, 19 जुलै 2023 रोजी शोध लागल्यानंतर तिचा बाल कल्याण समितीसमोर जबाब नोंदविण्यात आला. त्यात तिने सांगितले की, अनिस भिकारी तडवी (20, रा.हिंगोणा, ता.यावल) याने शारीरक संबंध केले. त्यानुसार शुक्रवार, 21 जुलै रोजी बाल लैंगिक अधिनियमानुसार कलम वाढविण्यात आले. तसेच संशयिताला अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड.पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.
