अकोला एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपदी शंकर शेळके


Shankar Shelke as Police Inspector of Akola LCB जळगाव : डॅशिंग, अभ्यासू व जळगाव जिल्ह्यात अल्पावधीत लोकप्रिय म्हणू परीचीत झालेले पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची अकोला एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे आदेश नुकतेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी काढले आहेत. शेळके यांनी मुक्ताईनगरसह जळगावात अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे.

नियुक्तीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव जिल्ह्यात पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी काम केल्याने त्यांच्याकडे कामाचा दांडगा अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात त्यांची बदली झाली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांचे अकोला एलसीबी पोलीस निरीक्षकपदी नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजेनंतर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

शिस्तप्रिय व लोकप्रिय अधिकारी
पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आपल्या कारकिर्दीला धरणगाव पोलीस स्थानकापासून सुरुवात केली होती. याठिकाणी त्यांनी पाळधी येथे व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली होती. या गुन्ह्यातील मास्टरमाईंड पोलीस कर्मचारी होता त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासासाठी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयात संशयितांच्या पोलीस कोठडीसाठी युक्तीवाद केला होता. अटकेतील संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयासमोर प्रभावीपणे मुद्दे मांडून तसेच बचावपक्षाचे मुद्दे खोडून काढले होते. तसेच अवघे एक-दीड वर्ष राहूनही धरणगावकरमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !