जळगावात फार्मासिटीकल कंपनीत चोरी : चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Theft in pharmaceutical company in Jalgaon : Thief in MIDC police net जळगाव : जळगाव एम.आय.डी.सी.तील डी 12 सेक्टर मधील रायेटेक्स फार्मसीटीकल फॅक्टरीच्या स्टोअर रूममधून 86 हजार 500 रुपये किंमतीचे एस.एस.2.5 लीटर मापाच्या मिल्क कॅनचे दोनशे नग, एस.एस. स्पेअर लिड पाच लीटर मापाचे 755 नग, एक एच.पी.ची पाण्याची मोटार आदी साहित्याची 7 ते 20 जुलै दरम्यान चोरी झाली होती. याबाबत प्रशांत दिलीपकुमार कोठारी (50, रा.विसंजीनगर, होमगार्ड ऑफीसजवळ, जिल्हापेठ, जळगाव) गुरुवारी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करीत सागर अशोक गायकवाड (भिलाटी, मेहरुण, जळगाव) याच्या मुसक्या बांधल्या आहेत. संशयिताने अल्पवयीनाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली देत 75 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, दीपक जगदाळे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, ललित नारखेडे, नाना तायडे, किरण पाटील आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार रामकृष्ण साहेबराव पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !