चाळीसगावात महाविद्यालयीन युवकाचा मोबाईल हिसकावला


A college student’s mobile phone was stolen in Chalisgaon चाळीसगाव : चाळीसगाव बसस्थानकातील सार्वजनिक शौचालयात लघूशंकेसाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाला तिघांनी धमकावत त्याच्याकडील मोबाईल हिसकावल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांचा कसून शोध
चाळीसगाव बसस्थानकातील शौचालयात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नचिकेत सुनील येवले (19, हिरापूर रोड., चाळीसगाव) हा तरुण गेल्यानंतर तिघा अनोळखींनी तरुणाला धमकावत त्याच्याकडील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावला. तरुणाने हा प्रकार शहर पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !