खासदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : जळगावहून पुण्यासाठी लवकरच विमानसेवा सुरू होणार


MP Unmesh Patil’s follow-up success : Flight service from Jalgaon to Pune will start soon चाळीसगाव : चाळीसगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जळगाव-पुणे विमानसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. जळगाव विमानतळावरील नियमीत प्रवासी वाहतूक सेवा ही बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आधी येथून दररोज मुंबई आणि अहमदाबाद येथे विमानसेवा सुरू झाली मात्र काही महिन्यातच ही सेवा बंद झाली होती. जळगाव ते पुणे आणि पुणे ते जळगाव अशी विमानसेवा सुरू करण्याची मागणी देखील कधीपासूनच करण्यात होत असलीतरी आता खासदारांच्या प्रयत्नांनी ही सेवा लवकरच सुरू होणार आहे.

खासदारांच्या प्रयत्नांना आले यश
खासदार उन्मेष पाटील यांनी सातत्याने केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतीरादित्य सिंदीया यांच्याकडे पाठपुरावा केला तसेच कंपन्यांशीदेखील बोलणे सुरू केले.जळगाव विमानतळाचा समावेश उडाण 5.0 अंतर्गत रीजनल कनेक्टीव्हिटी स्कीम मध्ये करण्यात आाल्यानंतर आता जळगावसह सिंधुदुर्ग, नांदेड आणि अगत्ती या विमानतळांवरून नियमीतपणे विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी उडो एव्हीएशन प्रायव्हेटे लिमिटेड कंपनीच्या फ्लाय-91 या विमानसेवेला परवानगी प्रदान करण्यात आली आहे.

नियमित व बिझनेस क्लास सुविधा उपलब्ध
उडाण 5.0 योजनेच्या आरएसी उपक्रमाच्या अंतर्गत जळगाव येथून नियमीतपणे पुणे, हैदराबाद आणि गोवा येथे विमानसेवा सुरू होणार आहे. वर नमूद केल्यानुसार फ्लाय-91 कंपनीची विमाने ही सेवा प्रदान करणार आहेत. या विमानसेवांमध्ये नियमीत तसेच बिझनेस या दोन्ही क्लासची सुविधा असणारी विमाने उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात, यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायीक व उद्योजकांना मोठी सुविधा मिळणार आहे. सर्व प्रकारच्या चाचण्यांची पूर्तता करून येत्या काही महिन्यांमध्ये या तिन्ही मार्गावरील विमानसेवा सुरू होईल.

प्रवाशांची मोठी सोय होणार
जळगाव जिल्ह्यातून पुणे येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. यातच भुसावळ व जळगावहून पुणे येथे जाण्यासाठी मोजक्या रेल्वे असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. एसटी अथवा खासगी लक्झरी बसेसवर पूर्णपणे अवलंबून रहावे लागत होते मात्र लवकरच सुरू होणार्‍या विमान सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !