भुसावळात सलग दुसर्या दिवशी जिल्हाधिकार्यांची भेट ; ईव्हीम क्लिनींगबाबत जाणली माहिती
District Collector’s visit to Bhusawal for the second day in a row ; Knowledge about eVim cleaning भुसावळ : जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदभार घेताच सोमवारी भुसावळात भेट देत ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाची पाहणी करीत स्वच्छतेबाबत सूचना केल्या होत्या तर दुसर्या दिवशी मंगळवारी सकाळी पुन्हा जिल्हाधिकारी भुसावळात आल्यानंतर प्रशासनातील अधिकार्यांची तारांबळ उडाली. भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामात मतदान यंत्र ठेवण्यात आली असून 20 हजार यंत्रांचे भेलच्या अभियंत्यांकडून क्लिनींग केले जात असल्याने त्याची पाहणी जिल्हाधिकार्यांनी केली. 10 ऑगस्टपर्यत हे काम सुरू राहणार आहे.
10 ऑगस्टपर्यंत चालणार काम
भुसावळ तहसील कार्यालयात जिल्ह्यात निवडणुकीसाठी लागणारी मतदान यंत्रे भुसावळातील गोदामात ठेवण्यात आली असून ही यंत्रे क्लिनिंग करण्याचे कामासाठी येथे भेल कंपनीचे 30 अभियंता शहरात दाखल झाले आहेत. अभियंता मशीन क्लिन करीत आहे. दररोज एक अभियंत्यास 15 मशीन क्लीन करण्याचे टार्गेट दिले असून मशीन क्लीन झाल्यावर त्यात लोगो लोड केला जात आहे. 20 हजार मशीन 10 ऑगस्टपर्यंत क्लिनिंग करून द्यायच्या आहेत. आलेल्या मशीनची क्लिनिंग करण्याचे काम सुरू केले आहे.
अधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
सोमवारी सुध्दा नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे येथे आले होते. मंगळवारी सुध्दा जिल्हाधिकारी प्रसाद यांच्यासोबत निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, प्रांताधिकारी जितेद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार निता लबडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, तहसीलदार सुनील समदाणी, नायब तहसीलदार अंगद आसटकर आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला असून भेल कंपनीचे अभियंता व महसूल अधिकारी यांच्या व्यतिरीक्त कुणालाही जावू देण्यास मनाई करण्यात आली आहे.
