एरंडोल तालुका हादरला : मुलींच्या वस्तीगृहात पाच मुलींचे लैंगिक शोषण


Erandol taluka shaken : Five girls sexually abused in girls’ hostel जळगाव : एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींच्या वस्तीगृहातील तब्बल पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनींच्या संस्थेच्या अधीक्षकांसह सचिवांकडे या प्रकाराविषयी वेळोवेळी तक्रार करूनही त्यांनी चालढकल केल्याचा प्रकारही समोर आला आहे. ऑगस्ट 2022 ते जून 2023 अशा मागील दहा महिन्यांपासून हा घाणेरडा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

असे आहे नेमके प्रकरण
ऑगस्ट 2022 ते जून 2023 या दरम्यान एरंडोल तालुक्यातील एका मुलींच्या वस्तीगृहात पाच मुली वसतीगृहात अभिरक्षेत असतांना वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगिक छळवणूक केली तसेच अनैसर्गिक अत्याचारही केला. या प्रकाराबाबत मुलींनी संस्थेचे अधीक्षक व सचिव यांना वेळोवेळी सांगितला मात्र त्यांनी ही माहिती लपवून ठेवली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शरद सदाशीवराव बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह महिला अधीक्षक अरुणा पंडित यांच्याविरोधात भादंवि 354, 376 (2) (ड) (एन) (क), 377, पोस्को कलम 3,4,5, 6,8,9,10,12, 19, 21, सह अनुसूचित जाती व जमाती कायदा कलम 3 (1) (अ) (ई) (व्ही) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीची बालकल्याण समितीकडून दखल
पीडीत मुली बालगृहात प्रवेशित असताना मुलींसोबत संस्थेतील काळजीवाहक गणेश पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याबाबत लेखी स्वरूपात तसेच व्हिडिओ शूटिंगमधील माहिती बालकल्याण समिती, जळगाव यांना पीडीतांसोबत झालेल्या चर्चेतून प्राप्त झाली होती. समितीमार्फत विचारणा केल्यानंतर ही बाब संस्थेचे सचिव व अधीक्षक यांना माहिती असूनदेखील त्यांच्याकडून कुठलीही कारवाई न झाल्याने अत्यंत गंभीर या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी जळगाव बालकल्याण समिती अध्यक्षांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले व त्यानंतर गुन्हा दाखल होताच आरोप गणेश पंडित व त्याची पत्नी अरुणा पंडित यांना अटक करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !