पाचोरा शहरात स्वीट मार्टच्या दुकानातून 20 हजारांची रोकड लांबवली
20,000 cash was withdrawn from Sweet Mart shop in Pachora city पाचोरा : शहरातील स्वीट मार्टच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सूत्रांच्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील सिंधी कॉलनीतील शिव मंदिराजवळ भवानी स्वीट मार्ट हे जितेंद्र टेकचंद पंजाबी (सिंधी कॉलनी, पाचोरा) यांचे दुकान आहे. अज्ञातांनी दुकानाच्या गल्ल्यातून 20 हजारांची रोकड लांबवली. 22 ते 23 जुलैदरम्यान घडला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भगवान बडगुजर करीत आहेत.


