म्हसावदनजीक रेल्वेतून पडल्याने उडीसातील तरुणाचा मृत्यू
Odisha youth dies after falling from train near Mhasavad जळगाव : कामासाठी गेलेल्या परप्रांतीय तरुणाची अचानक प्रकृती बिघडल्याने मित्रांसोबत माघारी गावी निघालेल्या परप्रांतीय तरुणाच ारेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी म्हसावद गावाजवळ घडली. कलीम बाबूराव कोमार (28, उडुरमा, ता.कुटूरा, उडीसा) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
चक्कर येवून पडताच मृत्यू
उडीसा राज्यातील उडुरमा येथील कलीम कोमार हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत गोवा येथे कामानिमित्त गेला होता. शनिवार, 22 जुलै रोजी गोव्याला पोहोचल्यानंतर कलीमची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याचे मित्र त्याला घेवून पुन्हा माघारी निघाले. बुधवार, 26 जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास म्हसावद गावाजवळ कलीम याला अस्वस्थ वाटत असल्याने तो बाथरुमला जाण्यासाठी जावून येतो, असे सांगून गेल. परंतु त्याची प्रकृती अधिकच खाल्यावल्याने त्याला चक्कर येवून तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. यामध्ये कलीम कोमर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना कळताच त्यांनी लागलीच जळगाव स्टेशनवर उतरून या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच त्यांना घेवून म्हसावद गाठले. यावेळी गावाजवळील रेल्वे रुळावर कलीम कोमरचा मृतदेह दिसून आल्यानंतर तो शवविच्छेदनासठी हलवण्यात आला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


