तळवेलमध्ये विद्यार्थ्यांच्या बक्षिसाची रक्कम चोरट्यांनी लांबवली


वरणगाव : तळवेल येथील पंडित नेहरू विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना बक्षीस वाटपासाठी आणलेली 40 हजारांच रोख रक्कम चोरट्यांनी बुधवारी पहाटेच्या वेळी लांबवली. या प्रकरणी मुख्याध्यापिका साधना लोखंडे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तळवेलच्या पंडित नेहरू विद्या मंदिरात बुधवारी पहाटे शाळेचे शिपाई घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून मुख्याध्यापकांच्या खोलीचे कुलूप तोडले व ड्रॉवरमध्ये विद्यार्थ्यांच्या बक्षिसाची असलेली 40 हजारांची रक्कम लांबवली. रविवार, 26 जानेवारी रोजी विविध स्पर्धा परीक्षा व इयत्ता दहावीतिल व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी ही रक्कम बँकेतून काढून आणण्यात होती तसेच पाकीटत ही रक्कम टाकून नावे लिहिण्याचे काम सुरू असताना अपूर्ण राहिलेले काम दुसर्‍या दिवशी करण्याच्या उद्देशाने ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आली होती मात्र चोरट्यांनी ही रक्कम लांबवली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !