कुंभारी येथे विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा


Matrimonial rape at Kumbhari : Crime against one जामनेर : तालुक्यातील कुंभारी येथे अंगणात खाटेवर झोपलेल्या 32 वर्षीय महिलेशी अंगलट करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित मूलचंद जेमा राठोड (कुंभार, ता.जामनेर) याच्याविरोधात जामनेर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
32 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, बुधवार, 26 जुलै रोजी रात्री आठ वाजता ती खाटेवर झोपली असताना संशयित मूलचंद राठोड याने येत महिलेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. याप्रकारानंतर पीडीतेने आरडा-ओरड केल्यानंतर संशयित पसार झाला तर पीडीतेने जामनेर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुभाष पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !