महसूल सप्ताहात होणार उत्कृष्ट अधिकारी, कर्मचार्‍यांचा सन्मान : प्रांताधिकारी जितेंद्र पाटील

वन नेशन वन कार्डचाही शुभारंभ होणार : भुसावळ तहसीलदार निता लबडे यांची माहिती


Honorable officers and employees will be honored during the revenue week : District Magistrate Jitendra Patil भुसावळ : महसूल सप्ताह अंतर्गत 1 ते 7 दरम्यान विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून महसूल आयुक्तांच्या उपस्थितीत वन नेशन वन कार्डचा शुभारंभ होणार असल्याची माहिती भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

सप्ताहात असे होतील कार्यक्रम
1 ऑगस्टला महसूल विभागातील उत्कृष्ठ काम करणार्‍या कर्मचारी व अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन तहसीलमध्ये गौरविण्यात येईल. तलाठी, मंडळाधिकारी, महसूल सहायक, कोतवाल, पोलीस पाटील, रेशन दुकानदार, शिपाई, मतदान केद्रस्तरीय अधिकारी व वाहन चालक यांच्या गौरवानंतर सप्ताहाला सुरूवात होईल. 2 रोजी महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत युवा संवाद प्रभाकर हॉलमध्ये साधला जाईल. 3 रोजी ‘क हात मदतीचा’ या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, विशेष अर्थ सहाय्य योजना याबाबत तालुका समितीची बैठक घेऊन मंजूर लाभार्थी यांना लाभ देण्यात येईल तसेच वरणगावात फेरफार अदालत व शासकीय योजनेचे शिबिर होईल. 4 रोजी जनसंवाद कार्यक्रम होईल. चार मंडळात फेरफार अदालत होईल. 5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी यात तालुक्यातील माजी सैनिकांचा मेळावा घेऊन त्यांचा सन्मान व 6 रोजी महसूल संवर्गातील कार्यरत निवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला जाईल, असे प्रांत जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांनी सांगितले.

महसूल आयुक्तांच्या वन नेशन वन कार्डचा शुभारंभ
तहसीलदार निता लबडे म्हणाल्या की, महसूल आयुक्त गमे यांच्या उपस्थितीत 2 रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमच वन नेशन वन कार्ड या संकल्पने अंतर्गत नवीन रेशनकार्डाचा शुभारंभ होईल. या कार्डावर कार्डधारकांना कुठेल्या रेशनदुकानात धान्य मिळेल तसेच भारतात कुठेही हे कार्ड वापरता येईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !