पाचोरा ते जामनेर नॅरोगेज रेल्वे बंद होणार ही निव्वळ अफवा


खासदार रक्षा खडसे यांची माहिती : डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याशी चर्चा

भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून पाचोरा ते जामनेर नॅरोगेज रेल्वे बंद होणार अश्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत असून त्या केवळ निव्वळ अफवा असून कोणत्याही परीस्थितीत पीजे रेल्वे बंद होणार नसल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. या संदर्भात भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याशी त्यांची चर्चादेखील केली.

रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार
खासदार रक्षा खडसे या मागील पाच वर्षापासून पाचोरा-जामनेर या नॅरोगेज रेल्वेमार्गाला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत करून मलकापूरपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाचोरा ते जामनेर या नॅरोगेज रेल्वेमार्गाला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत करून मलकापूर पर्यंत वाढवण्यासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूददेखील करण्यात आली आहे.
24 जुलै 2019 रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी भेट घेतली होती. खान्देश-मराठवाडा-पुणे नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात करण्याची प्रसंगी मागणीही करण्यात आली.

अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन
खासदार रक्षा खडसे यांनी पाचोरा ते जामनेर नॅरोगेज रेल्वे बंद होणार या अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भुसावळ विभागात दोन मेमु ट्रेनचे परीक्षण पूर्ण होत आले असून येत्या आठ दिवसात मेमु रेल्वेला खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !