जळगावातील टेंट व्यावसायीकाचे मालवाहू चारचाकी वाहन लांबवले


A cargo four-wheeler of a tent trader in Jalgaon was delayed जळगाव : जळगावातील टेंट व्यावसायीकाचे मालवाहू चारचाकी वाहन जळगाव-आसोदा रोडवरील मुंजोबा मंदिराजवळून लांबवण्यात आले. याप्रकरणी सोमवारी दुपारी दोन वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
मिलिंद शशिकांत दलाल (36, चौघुले प्लॉट, जुना ममुराबाद रोड, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. टेंट हाऊसचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे सामान वाहतूक करण्यासाठी (एम.एच.04 जी.एफ.9012) क्रमांकाचे चारचाकी वाहन आहे. गुरुवार, 27 जुलै रात्री 11 वाजता ते 29 जुलै सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान जळगाव-आसोदा रोडवरील मुंजोबार मंदीराजवळ चारचाकी वाहन पार्क केले मात्र अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. मिलिंद दलाल यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर सोमवारी दुपारीदोन वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !