जळगव जिल्हाधिकारी कार्यालयात 7 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन


Democracy Day on 7th August at Jalgaon Collectorate जळगाव : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 7 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरीकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !