भुसावळ विभागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ : एसीसी व एनआरसी कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक शुक्रवार, 24 रोजी देण्यात आल्यानंतर भुसावळ विभागातही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भुसावळ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. दरम्यान, बंदमध्ये शाळा, महाविद्यालय, एस.टी.बसेससह हॉस्पीटल, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.

रावेरात तहसील प्रशासनाला निवेदन
रावेर-
वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. रावेर शहरात मात्र बंद पाळण्यात आला नसलातरी रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघातर्फे रावेर नायब तहसीलदार संजय तायडे यांना बंदला पाठिब्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. या बंदला रावेर तालुका काँगसे पक्ष, ऑल इंडिया मसजिद ए इलेहादुल मुस्लीमिन, रावेर तसेच मुस्मीम पंच कमेटीने बंदला पाठिाबा दर्शवला. निवेदनावर वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मुस्लीम पंच कमिटीचे शे.गयास शे.रशीद एम.आय.एम.चे शे.वसीम, राजुभाऊ खिरवडकर, नुरा तडवी, वंचितचे सुरेश अटाकाळे, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, राहुल डी.गाढे, विनोद तायडे, अशोक शिरतुरे, दौलत अढांगळे, नितीन तायडे, भीमराव तायडे, सै.आरीफ सै.मोहम, शे.नासीर शे.कालु, शे.रफीक, गौतम अटकाळे, युसुफ खान, विकास सवर्णे, शे.जावेद, रवींद्र भिल्ल आदींची नावे आहेत.

बोदवडला कडकडीत बंद
बोदवड-
महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. शहरातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंदला पाठिंबा दर्शवला. भाजपा सरकारने संमत केलेले कायदे हे आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय यांच्याविरुद्ध आहेत असल्याचे मत जामा मशिदीचे इमाम अमीन पटेल म्हणाले. काँग्रेसचे नगरसेवक डॉ.सुधीर पाटील, दिलीप पाटील, विनोद माईकर, शे.महेबूब शे.चांद, राष्ट्रवादीचे प्रमोद धमोडे, आनंदा पाटील, शिवसेनेचे कलीम भाई, शेतकरी शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे संजय पाटील, अनंता वाघ, जमिया तुलमा-ए हिंदचे मौलाना अमीन इशाती सह शेकडो मुस्लिम समाजातील तरुण बंदमध्ये सहभागी झाले. बंद यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे बोदवड तालुक्यातील सुपडा निकम, महेंद्र सुरळकर, शेख सलीम शेख खलील, गोपीचंद सुरवाडे, विनोद पाडर, नागसेन सुरळकर, सुरेश तायडे, गोविंदा तायडे, शाहरुख शहा, सद्दाम कुरेशी, मौलवी अमीन, बबलू हाफिज, महेमुद शेख, अक्रम शेख, बबन बोदडे, सुभाष इंगळे, जितेंद्र सूर्यवंशी, शांताराम मोरे, संजय गायकवाड, राजुभाई मॅकेनिक, रफा भाई कुरेशी परीश्रम घेतले.

मुक्ताईनगर कडकडीत बंद
मुक्ताईनगर-
सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर शुक्रवारी मुक्ताईनगरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व व्यापार्‍यांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. बंद यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.विनोद इंगळे, संतोषद बोदडे, अ‍ॅड.राहुल पाटील, रवींद्र बोदडे, राजू बोदडे, नंदू वाघ, माणिकराव इंगळे, अमोल बोदडे, किरण सावकारे, वसीम मन्सूरी, विश्वनाथ गणेश, विजय बोदडे, शे.मुशीर, आनंदा वाघ, अशोक वाघ, गणेश इंगळे, पुना इंगळे, निलेश भालेराव, पंकज चोपडे, रमेश वानखेडे, विशाल वाघ, मनोज धुरंधर, अ‍ॅड.दीपेश वानखेडे आदींनी सहकार्य केले.

विविध संघटनांचा बंदला पाठिंबा
मुक्ताईनगर बंदला मुस्लिम संघटना अल-हिरा, काँग्रेस व भारत मुक्ती मोर्चाने पाठिंबा दिला. अल हिरा संघटनेचे शकुर जमादार, सलीम खान, जाफर अली, शकील मेंबर, रफिक सलाम, आसीफ टेलर, मुशीर मन्यार, भिकन सांडू, हारून भाई, काँग्रेसचे आत्माराम जाधव, बी.डी.गवई, आसीफ खान, ईस्माईल खान, मोहम्मद आसीफ खान व भारत मुक्ती मोर्चाने नितीन गाढे, प्रमोद सौधळे आदींनी उपस्थिती देत पाठिंबा दर्शवला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !