गोंडगावातील बेपत्ता बालिकेचा मृतदेह कुट्टीच्या ढिगार्यात आढळला
The body of the missing girl from Gondgaon was found in the rubble of Kutti भडगाव : तालुक्यातील गोंडगाव येथील गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या बालिकेचा मृतदेह कुट्टीच्या ढिगार्याखाली दडपलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर खळबळ उडाली. नऊ वर्षीय बालिका 30 जुलैला बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. कल्याणी संजय पाटील असे मृत बालिकेचे नाव आहे.
भउगाव पोलिसात मिसींगची तक्रार
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कल्याणी पाटील ही 8 वर्ष 9 महिन्यांची बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार 30 रोजी सायंकाळी भडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलीस खात्यातर्फे या बालिकेचा शोध सुरू असताना मंगळवारी गावातील एका गोठ्यातील कडबा कुट्टीच्या ढिगार्यात ही बालिका मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, सहा. फौजदार अनिल जाधव, हवालदार लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली.






दबलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहे. या दुर्दैवी घटनेने गावासह परीसरात खळबळ उडाली आहे. बालिकेचा मृतदेह शव शवविच्छेदनासाठी जळगाव मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आला. दरम्यान, गावातील काही ग्रामस्थांना मका कुट्टीच्या खळ्या जवळ मुलीची चप्पल दिसली. तिच्या चपलेची ओळख पटल्याने मका कुट्टी जवळ शोध सुरू झाला. दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना मुलीचा दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमकं कारण समजू शकणार आहे. परंतू अपघात की, घातपात याबाबत चर्चेला उधाण आले आहे.


