जळगाव शहरातील रामचंद्र नगरात धाडसी घरफोडी


Daring burglary in Ramchandra Nagar of Jalgaon city जळगाव : शहरातील अयोध्या नगराजवळील रामचंद्र नगरात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत 41 हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी मंगळवारी दुपारी दोन वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
नरेंद्र मानसिंग पाटील (32, रामचंद्र नगर, अयोध्या नगरजवळ, जळगाव) हे व्यापारी आहेत. 31 जुलै सकाळी नऊ वाजता ते 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू असा एकुण 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !