जळगावात भरधाव डंपरने घेतला चार वर्षीय चिमुकलीचा बळी


A four-year-old child was killed by a speeding dumper in Jalgaon जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनय जवळ गुरुवारी घडला. या अपघातात प्रेरणा योगेश नेमाडे (4, माऊली नगर, जळगाव) या चिमुकलीचा मृत्यू झाला. अपघातानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठा आक्रोश केला.

भरधाव डंपर दुचाकीला धडकला
योगेश नेमाडे हे आपल्या पत्नी दक्षता, मुलगी प्रेरणा आणि मुलासह माऊली नगरात वास्तव्याला आहेत. त्यांची चार वर्षाची मुलगी प्रेरणा ही जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिक्षण घेते. गुरुवारी सकाळी प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता या स्कूटी (एम.एच.12 ई.डब्ल्यू.8829) ने प्रेरणाला घेण्यासाठी गेल्यानंतर घराकडे परतत असताना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनय जवळ भरधाव वेगाने येणार्‍या डंपर (एम.एच.19 सी.वाय.6769) ने जोरदार धडक दिल्याने चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !